
विवेक बा मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी – आज दिनांक 28/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोमकें पेनगंडा हद्दीतील पेनगंडा ते नेलगुंडा रोडवर पेनगुंडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्यांचे स्मारक बांधलेले आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बिडीडीएस, प्राणहिता व विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरु केले असता, पेनगंडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. बिडीडीएस पथकाने सदर परिसराची कसुन तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उध्वस्त केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी), श्रेणिक लोढा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान), विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून, माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही व त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करु नये असे आवाहन केले..














