भाकसखेडा येथे दि.लि. होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा सत्कार

0
49

बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर – आज (दि.28) भाकसखेडा ता.उदगीर येथील स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयातील इयत्ता 10 वी शालांत परीक्षा मार्च 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कै.दि.लि.होळीकर प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करून रोख पारितोषिक देण्यात आले.सलग दहा वर्षापासून हा कार्यक्रम घेण्यात येत असून या कार्यक्रमासाठी होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराव जाधव यांच्यातर्फे प्रतिष्ठानकडून प्रथम जाधव नंदिनी संभाजी 96% हिला 1001रुपये स्मृतीचिन्ह पुस्तक,प्रमाणपत्र तसेच द्वितीय बुर्लै आयोध्या राजेंद्र 92.60% हिला 701.रु स्मृतीचिन्ह देव माणूस पुस्तक प्रमाणपत्र तसेच
तृतीय कांबळे मेघराज धोंडीराम 87.20% यास 501.रु स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र पुस्तक देऊन व फेटा शाल पुष्पहारणे सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर तांबे हे अध्यक्ष होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा प्रतिष्ठानचे सहसचिव यशवंतराव बिरादार आरबीआयचे निवृत्त मॅनेजर मुरलीधर जाधव,प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी ,स्वामी ,जाधव तसेच जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक शेख,केंद्रीय मुख्याध्यापक शेगसारे यावेळी सहशिक्षिका शिंदे,लादे,बानाटे तसेच सहशिक्षक मुद्गुले,केदार,कोळी,होळकर, वाडीकर,भालेराव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रमाकांत गायकवाड यांनी केले.सर्व विद्यार्थ्यांना प्रतिष्ठान तर्फे वही,पेन चे तसेच अनाथ मुलगी कु.रेणुका कांबळे ला गणवेशाचे वाटप करण्यात आले व विद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here