prabodhini news logo
Home चंद्रपूर मेहा बुज येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

मेहा बुज येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

0
190

महोत्सव समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची विशेष उपस्थिती

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सावली तालुक्यातील मेहा बुज येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा ‘मानवता दिन सप्ताह’ कार्यक्रम 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या महोत्सवात सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चांदेकर महाराज मोझरी यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष उषा भोयर, सतिश नंदनगिरवार, सचिन कोलते, रोशन पेंदाम, परसराम सय्याम, सुदाम धात्रक, संदीप पूनमवार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद चिमूरकर यांनी आपल्या विचारांद्वारे राष्ट्रसंतांच्या शिकवणीचे महत्व अधोरेखित केले. या महोत्सवाने मानवी मूल्ये आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देत ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here