कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथे आदिवासी परधान समाज तर्फे दि.२७ डिसेबर २०२४ ला भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.सकाळी १०वाजता आदिवासी परपंरानुसार पूजा करण्यात आली.आणि त्यानतंर सायंकाळी मुख्य मार्गदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज उईके ग्रामपंचायत सदस्य नवरगांव, तसेच प्रमुख पाहुने म्हणून मंगेश मेश्राम सदस्य ग्राम पंचायत रत्नापुर,सुरेश सलामे, आंनद मेश्राम नवरगांव, सरफराज पठान आदि मान्यवर.मंचावर उपस्थित होते.पंकज उईके व मंगेश मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यकमाचे संचालन टीकाराम कुंभरे,तर आभार विद्याधर गेडाम यांनी केले.कार्यकमानंतर स्नेह भोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशसवी करण्या साठी अभय मसराम,रमेश कुंभरे,सूरज कुंभरे,माणिक गेडाम, सोमेश्वर गेडाम,पवन कुंभरे,गणेश मसराम,उदालक उईके,चेतन परचाके,राहुल मसराम, देवरस गेडाम,राहुल मसराम, सुधाकर कुंभरे,विश्वमित्र मसराम,विद्याधर गेडाम।इत्यादीनी सहकार्य केले.

