प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – थर्टी फर्स्ट

0
139

थर्टी फर्स्ट म्हणजे काय? तर वर्षाचा गोड शेवट म्हणून आपण 31 डिसेंबर साजरा करतो. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो.
भारतीय राज्यघटनेत कलम 19 नुसार नागरिकांना स्वतंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.याचा अर्थ असा नाही की, आपण आपली कर्तव्य विसरून मनमानी करावे.
“थर्टी फर्स्ट पिऊन खाऊन मस्त” असा वर्षाचा गोड शेवट आजकालची तरुणाई करताना दिसत आहे. शहरी झगमगाट आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे.काय कमावले आणि काय गमावले याचे भान नं ठेवता मद्यधुंद तालावर थिरकणारी पावलं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुढे पडतात.तीच पावले वर्षाचा शेवट करतात. वर्षाचा नाही तर आपल्या संस्काराचा शेवट असतो, तर कधी कधी आयुष्याचा देखील शेवट होतो.आणि पाहता-पाहता नवीन वर्षाच्या बातम्या कानावर पडतात.मद्यधुंद अवस्थेत तरुणावर तरुणीवर हल्ला ,मद्यधुंद अवस्थेत गाडी चालकाचा सुटला तोल मृत्यूला आमंत्रण दोष कुणाचा आपलाच ना?
समाजातील ज्ञानी वरिष्ठ लोकांच्या रागाचा रोष अनावर होऊन सरकारच्या नावे खडे फोडतो ,सरकार झोपलं आहे का? का मेलं!एका नाण्याला दोन बाजू असतात.तसंच एक सरकार झोपलं तर दुसरं सरकार जागी असतं,एका सरकारने त्या दिवसांपूर्ती दरुबंदी केली, तर दुसऱ्या सरकारकडे चोरून उपलब्ध असते.सरकार जरी झोपले असले तरी आजची तरुणाई जागी राहायला हवी खान, पान,नशा यावर स्वतःच्या मनाने बंदी घालायला पाहिजे, देशाची खरी गरज आजची तरुणाई तीच झोपली तर लोकशाही जिवंत राहील का?तरुण पिढी विकली गेली तर देशाचं काय?कारण याच देशात आपलं घर आपला परिवार आहे.याचे भान ठेवून भानावर आजच्या तरुण पिढीने यायला पाहिजे.
बार,पब,डान्सक्लब, हॉटेल्सची कमाई जोरात होते.ते लोक भानावर असतात कारण एकच बिजनेस महत्त्वाचा असतो.आपण मात्र बेभान थर्टी फर्स्ट एन्जॉयमेंट ह्याच विचारात मग्न असतो.मग आम्हाला सोबत गर्लफ्रेंड हवी असते तरकोणाला बॉयफ्रेंड हवा असतो. का?तर वर्षाचा शेवट आजचा दिवस जगून घ्यायचा .खरंच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करता-करता नात्याची किंमत इतकी कमी झाली आहे का?गल्लीत एक, दिल्लीत एक, वर्षअखेरच्या गोंधळासाठी एक मित्र मैत्रीण हवे म्हणजे हवे.सत्य कटु असते फॅशनच्या नवाखाली पडलेला डोळ्यावरचा पडदा उघडायलाच हवा.
सर्व सारखे असतात असं मी मुळीच म्हणणार नाही.प्रेम ही परमेश्वराची अनमोल देणगी आहे.नातं निर्मळ प्रामाणिक आयुष्यभर समजून घेणार एकाबरोबरच विश्वासाने आयुष्य कडेला जाणार असाव. टाइमपास करू नका
आयुष्यात एन्जॉयमेंटदेखील तेवढीच महत्त्वाची आहे.परंतु नशा म्हणजे एन्जॉयमेंट मुळीच नाही.एन्जॉय करा.दुष्परिणामाची जाणीव मात्र ठेवा.
शेवटी एवढेच सांगेन आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे आयुष्य मौल्यवान मोल करता आलं पाहिजे.एन्जॉय करा छान आयुष्य जगा पण डोळे उघडे ठेवून

लेखिका राणी भालेराव
पुणे महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here