दुधवाही येथे मंडईनिमित्त “बाळा… मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोगाचे यशस्वी सादरीकरण

0
161

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते नाटकाचे उद्घाटन

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर

ब्रम्हपूरी तालुक्यातील दुधवाही येथे आय .सि.सि.व डि.सी.सि. क्रिकेट क्लब दूधवाही यांच्या सौजन्याने “बाळा… मीच तुझी आई रे” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला रोशन नवघडे ठेकेदार , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्ये. सहउद्घाटक म्हणून . संजय बगमारे ठेकेदार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष .नामदेवराव लांजेवार मा.प.स.सभापती,रामदास राऊत या कार्यक्रमाचे, प्रमुख पाहुणे मणुन .वनिता राऊत पो.पा.हत्तीलेंडा, रामकृष्ण राऊत,जतपले इंजिनियर, देवाजी सौंदरकर पो.पा दुधवाही ,कैलास शेम्बरकर ग्रा प.सदस्य दुधवाही, सेलोटे सर जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक दूधवाही, अमोल बनसोड, दिगांबर बगमारे ,अन्य मान्यवरांचीही उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “मंडई ही आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही लोककला आणि परंपरा जतन करणे आपले कर्तव्य आहे. अशा नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते. ‘बाळा… मीच तुझी आई रे’ हे नाटक केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार करायला लावणारा संदेश देते. या उपक्रमातून समाजातील एकात्मता वृद्धिंगत होते आणि कलेला नवीन दिशा मिळते. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, ज्यामुळे आपली संस्कृती अधिक संपन्न होईल.”
मंडईनिमित्त आयोजित “बाळा… मीच तुझी आई रे” या नाटकाचा दुधवाही तील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या यशस्वी आयोजनासाठी आय .सि.सि.व डि.सी.सि. क्रिकेट क्लब दूधवाही मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here