कु. सोनाली कोसे नागभिड तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सावरगाव – नागभिड तालुक्यातील ग्राम पंचायत वाढोणा येथे फातिमा शेख यांचे जयंतीचे औचित्य साधुन समता फाउन्डेशन मुंबई, ग्राम पंचायत वाढोणा व शालिनीताई मेघे हास्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपुर यांचे सयुक्त विद्यमाने निशुल्क मोतिबिंदु नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाला.
समाजाचे देणे आहे या उदात्त हेतुने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निःशुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन मा. देवेंद्र प्रेमदास गेडाम सरपंच ग्राम पंचायत वाढोणा यांचे हस्ते फातिमा शेख यांचे प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन शिबिचाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरातील रुग्णाना तपासणी करीता डाँ. सोहम गोदेवार (नेत्र अधिकारी नागपुर) व डाँ. प्राजय हर्ष (नेत्र अधिकारी नागपुर) हे उपस्थित होते त्यांनी एकुण १०६ रुग्णांनाची तपासणी केली. त्यापैकी ५१ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले त्यांना २०/०१/२०२५ ला नागपूर येथील शालिनीताई मेघे हास्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी मा. देवेंद्र गेडाम सरपंच ग्राम पंचायत वाढोणा मा. आकाश निकुरे हेल्थ आफीसर समता फांउन्डेशन मुंबई ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

