‘साइडबंब’ चे काम अपूर्णच वर्ष उलटले…

0
111

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583 – आलापल्ली: कुठलेही काम करत असताना ठरवून दिलेला एक कालावधी असते. मात्र सबंधित विभाग जर गाढ झोपेत असेल तर कंत्राटदार यात दिरंगाई करणारच. असाच काही प्रकार आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावर दिसून येत आहे. डांबरीकरणाचे कामाचे भूमिपूजन करून वर्ष लोटून गेला आणि डांबरीकरणाचे काम करून ८ महिने झाले तरी ‘साइडबंब’चे काम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावरील बोटलाचेरू फाट्यापासून ते पुढे आलापल्लीकडे ४ किमीपर्यंत डांबरीकरण करण्यासाठी शासनाने १९९.३७ लाख रुपयांचानिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मंजूर केला जानेवारी २०२४ मध्ये तत्कालीन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन देखील झाले. मात्र सबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली यांच्या दिरंगाईमुळे हे काम २०२४ च्या मे महिन्यात करण्यात आले. डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन जवळपास ८ महिने लोटून गेले.

तरी ‘साइडबंब’ चे काम पूर्ण झाले नाही. यातच सदर रस्ता अरूंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देत असताना अथवा ओव्हरटेक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सबंधित कंत्राटदाराने डांबरीकरणाच्या कामाला विलंब केला, त्यानंतर ‘साइडबंब’ कामात

राष्ट्रीय महामार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून जड वाहनांची वर्दळ असल्याने पर्यायी मार्ग म्हणून आलापल्ली ते मुलचेरा या मार्गाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर झालेल्या डांबरीकरणानंतर ‘साइडबंब’चे काम झाले नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आणखी या रस्त्यावर किती जीव घेण्याची प्रतीक्षा सबंधित विभाग करीत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर साइडबंबचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here