अड्याळ ला नगरपंचायत दर्जा ऐवजी तहसील चा दर्जा देण्यात यावा

0
99

जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार परिणय फुके यांना निवेदन सादर

जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
मो.9665175674

भंडारा- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीस नगरपंचायत दर्जा न देता तालुक्याच्या दर्जा देण्यात यावा असे निवेदन अड्याळ ग्रामपंचायत सरपंच शिवशंकर मुंगाटे, प्रशांत मुरकुटे, विकास टेंभुर्णे, शिवनाथ शेंद्रे, भारत कराडे व ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक 14 जानेवारी 2025 रोज मंगळवार ला निवेदन सादर केले असून जिल्हाधिकारी यांच्याशी खालील विषयावर चर्चा करून ज्वलंत मागणी केलेली आहे. खाली दिलेल्या संदर्भावरून दिनांक १३/०८/२०२४ ला अध्यान ग्रामपंचायतला नगरपंचायत करण्या संदर्भात आलेल्या राज्य शासनाच्या पत्रानुसार दिनांक १२/०९/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांच्या कार्यालयात अड्याळ ग्रामपंचायतला नगरपंचायत चा दर्जा देण्यात येऊ नये करिता सकारण आक्षेप नोंदविला आहे.
दिनांक ३१/१२/२०२४ रोजी मा. अध्यक्ष स्थायी समिती जि.पं. भंडारा यांना अड्याळ ग्रामपंचायतला नगरपंचायत करण्यास विरोध असल्याचा ग्रामस्थांचा निवेदन पत्र व ग्रा.पं. कार्यालयाचा दिनांक ३०/१२/२०२४ या मासिक सभा दराव सादर केला आहे. तसेच पवनी तालुक्यातील मौजा अड्याळ येथील खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.अड्याळ ग्रामपंचायतला नगर पंचायत बनविण्यास आमचा सकारण विरोध आहे. मौजा नेरला व मौजा सौंदळ हे गाव पुनर्वसित असून या गावातील लोकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन मजुरी असून या गावातील बहुसंख्य लोक दारिद्र रेषेखालील आहेत व त्यांचा अड्याळ नगर पंचायत मधे समाविष्ट होण्यास नकार आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्ध्योगिक नागरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा ४०) याच्या कलम ३४१ अ चे पोटकलम (१ ब) या नियमानुसार अड्याळ ग्रामपंचायत नगरपंचायत करण्याकरिता बसत नाही. कारण अड्याळ हे गाव महानगरपालिका किंवा ‘अ’ वर्ग नगरपरीषदेपासून २० कि. मी. अंतरा पेक्षा जास्त आहे. व आमच्या गावात अकृषक कामांमधील रोजगाराची टक्केवारी २५% पेक्षा कमी आहे.
तसेच अड्याळ गावाची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार ८८४७ आहे व २२६९ कुटुंब संख्या आहे. त्यापैकी १०४१ कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील आहेत. व रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड धारक कुटुंब २५६५ आहेत. त्यापैकी २६२७ मजूर कार्यरत आहेत. हे सर्व लोक मजुरी वरच आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गावामधील ९०% जनता ही शेती व शेतमजुरीवर आधारित आहे.
गावात कुठल्याही प्रकारचे मोठे उद्योग (कारखाने, इंडस्ट्रीयल एरिया) नाहीत.

अड्याळ गावात रोजगाराच्या संधी अल्प असल्यामुळे येथील युवा, काही कुटुंब उदरनिर्वाहाच्या शोधात गावाबाहेर स्थलांतरित होत आहेत. गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती शहरी भागासारखी नाही.
अड्याळ वासियांना बऱ्याचश्या वैयक्तिक लाभाच्या जि. प. / पं. स. च्या योजनांना मुकावे लागणार आहे.
नगर पंचायतीचा अधिक आर्थिक भुर्दंड सामान्य ग्रामस्थांवर बसणार आहे.
नगर पंचायत मध्ये अड्याळ गावाचा सर्वांगीण विकास दिसून येत नाही.वरील सर्व कारणे लक्षात घेता सरपंच शिवशंकर मुंगाटे व ग्रामस्थ प्रशांत मुरकुटे , विकास टेंभुर्णी, शिवनाथ शेंद्रे , भारत कराडे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , आमदार विधान परिषद यांना निवेदन सादर केले आहे.

प्रतिक्रिया
अड्याळ गावात त्रुट्‌या असल्यामुळे आमचा अड्याळ ग्रामपंचायतला नगर पंचायत बनविण्यासाठी प्रखर विरोध आहे. आम्हाला तालुक्याच्या दर्जा देण्यात यावा. तरी सदर वरील विषयांची योग्य पडताळणी करून अड्याळ वासियांना न्याय द्याल हीच विनंती.

सरपंच शिवशंकर मुंगाटे
ग्राम पंचायत अड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here