पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

0
164

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक – चंद्रपूर, दि. 24 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथे आगमन व प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय

ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता

चंद्रपूर, दि. 24 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here