prabodhini news logo
Home ठळक बातम्या नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा

नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा

0
122

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मातृभाषा अध्यापक संस्था पुणे व रोटरी क्लब पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या महिन्यात नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.अनेक शाळांनी यात अगदी उत्स्फूर्त सहभाग दाखवला होता. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.ज्ञानप्रबोधिनी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.त्याचे सादरीकरण झाले.
लहान गट, मोठा गट, वाचिक अभिनय, वैयक्तिक, शिक्षक नाट्य संहिता लेखन, सांघिक असे सन्मान करण्यात आले .
मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.या संस्थेच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले.संस्थेतील पदाधिकारी मा.संध्या माने,आ. वंदना आणेकर मा. निमल गीताभारती, मा. निफाडकर मंगल ,मा.पढेर विकास मा. शामला पंडित (दीक्षित), मा.सुरेखा लेंभे,मा.श्रीम.सोनवणे सुरेखा , मा.जगताप सुजित, मा.गायके संभाजी, मा.पिंगळे संजय, मा. सुरळकर सुलभा, मा.शारदा पानगे यांचे कार्यक्रम सुनियोजित पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रफुल्ल मुक्कामावर यांनी सिंगापूर या देशात मराठी शिकवण्याचे अनुभव सांगितले.शालेय वयापासूनच आपल्यातील कौशल्य ओळखून स्वतःचा व्यक्तीमत्व विकास साधावा.प्रमुख पाहुणे मा . मयुरा डोळस यांनी अभिनय क्षेत्रात नेमकं काय करावं यासाठी मार्गदर्शन केले. मा .संभाजी गायके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.लेखक आणि कवी मा.प्रफुल्ल मुक्कावार .त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मा.मयुरा डोळस या उद्योजिका, लेखिका, दिग्दर्शिका यांचे मार्गदर्शन लाभले नवीन काही तरी शिकत राहिले पाहिजे.हे आजच्या काळाची गरज आहे.. कृत्रिम बुद्धिमत्तेचा या काळात अनेक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.डी इकॉनॉमी समजून घ्या ,त्याचा भाग बना.एकाच आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत.स्वतःची आवड ओळखा. मा .सुरेखा लेंभे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार मा. संजय पिंगळे यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here