प्रबोधनकार गायक भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जाहीर सत्कार
तुमसर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील देवा डी येते महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे सलग्नित, भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर द्वारा आयोजित, दोन दिवसीय विभागीय सांस्कृतिक महोत्सव 2025, दि. 28/01/2025, 29/01/2025 जानेवारी रोज मंगळवार बुधवार ला, स्थळ- दुर्गा मंदिर समोरील भव्य पटांगणावर, बाजार चौक, देवाडी, तुमसर रेल्वे स्टेशन, जिल्हा भंडारा, येथे मोठ्या उत्साहात पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र अनिल बावनकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप सावे, महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रमोद तीतरमारे, विदर्भ प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, बादु ला बराडे, ग्रामपंचायत सरपंच आशिष टेंभुरकर, विदर्भ उपप्रमुख, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, शाहीर अरुण मेश्राम, शाहीर मोहनलाल बारसागडे, केंद्रीय सल्लागार, शाहीर इशाक भाई शेख, केंद्रीय सदस्य प्रेम राज राऊत, विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे, सुप्रसिद्ध गायक उमेश बोरकर, कार्यक्रमाचे आयोजक गणेश राम देशमुख, वसंता कुंभरे, अशोक बुधे, नरेश देशमुख, मारुती निंबाते, उदेलाल पटले, रामप्रसाद बनसोड, शाहीर गणेश मेश्राम, योगिता नंदनवार वर्धा, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रजलित करण्यात आले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरनापुर येथील प्रबोधनकार गायक भीम शाहीर, प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले, त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शाहीर गणेश मेश्राम, सुप्रसिद्ध गायक उमेश बोरकर, गायिका सविता महल्ले, सुनिता भोयर, गायिका साधना बोरकर, गायिका नीलकमल गोंडाने, शाहीर अरुण मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, दिलीप मेश्राम, राजेंद्र बावणे, वासुदेव नेवारे, शंकर मोतकर, रवींद्र मेश्राम, रामराव वडांद्रे, श्रीकांत तितरमारे, भीम शाहीर प्रदीप कडबे, दिलीप मानापुरे, कल्पना कामठे, प्रभा पाटील, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, गणेश राम देशमुख, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश देशमुख यांनी केले, आभार प्रदर्शन दिलीप मनापुरे यांनी केले, मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते..

