चौगान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन

0
127

महोत्सव समारंभाचे माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर

ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे ग्रामपंचायत चौगान यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा ‘मानवता दिन सप्ताह’ कार्यक्रम २९ जानेवारी २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या महोत्सवात सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार दुरदर्शन झि मराठी कलाकार तुषार सुर्यवंशी नागपुर यांचे जाहीर कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष.अतुल देशकर मा.सदस्य.विधानसभा.ब्रम्हपुरी,या वेळी उपाध्यक्ष म्हणून .प्रा.डॉ.अमिरजी धमानी अध्यक्ष जनता शिक्षण सं.नागभिड, यावेळी प्रमुख उपस्थिती.रविंद्र घुबडे संवर्ग विकास अधिकारी प.स.ब्रम्हपुरी,मिलींद कुरसुंगे विस्तार अधिकारी प.स.ब्रम्हपुरी, उमेश धोटे सरपंच चौगान,अंकुश मातेरे उपसरपंच चौगान,सुयोग बाळबुध्दे,मनोज भोपाल,सचिन लिंगायत सरपंच रानबोथली,डॉ.सुखदेवे आरोग्य अधिकारी चौगान,विलास चौधरी ग्रा.वि.अ. ग्रा.प. चौगान, किशोर तिडके मा.पो.पा. चौगान, मधुकर राऊत अध्यक्ष त.मु.स.चौगान,सुरज शिवनकर, सरीता बुराडे ग्रा.प.सदस्या.चौगान,जयश्री बुराडे ग्रा.प. सदस्या. चौगान,सुधा मैन्द ग्रा.प.सदस्या. चौगान, यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद चिमूरकर यांनी आपल्या विचारांद्वारे राष्ट्रसंतांच्या शिकवणीचे महत्व अधोरेखित केले.जीवन विकासाचे शिक्षक गावीच असावे सर्वसंपन्न आपुल्याची ग्रामरचनेचे आयोजन शोभवाया शिकवावे पाठशाळा असावी सुंदर जेथे मुली -मुले होती साक्षर काम करावयाची तत्पर शिकती जेथे प्रत्यक्ष सुंदर गाणे बोलणे.वागणे.टापटिपीने घरी राहणे आपले काम आपण करणे शिकवावे तया.मी समजतों गांवही शरीर.त्यास राखावें नेहमी पवित्र.त्यानेच नांदेल सर्वत्र.आंनद गावी.जैसे आपण स्नान करावे.तैसे.गांवही स्वच्छ ठेवीत जावें .सर्वचि लोकांनी झिजुनी घ्यावे.श्रेय गांवाच्या उन्नतीचे या महोत्सवाने मानवी मूल्ये आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देत ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here