
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ मधील संत तुकाराम अध्यासन केंद्राद्वारे संत तुकारामांची सुभाषिते या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे व जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम सुभाष सर यांचे मार्गदर्शन लाभले. कवी व साहित्यिक डॉ.विद्याधर बन्सोड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी IQAC समन्वयक डाॅ.नाहिदा बेग उपप्राचार्य प्रोफेसर बोढाले सांस्कृतिक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.आय. एस कोंड्रा साहित्यिक व कवी डाॅ.विद्याधर बन्सोड भूगोल विभाग प्रमुख डॉ. योगेश्वर दूधपचारे प्रा.दिलीप चौधरी डॉ.कीर्ती वर्मा व मराठी विभाग प्रमुख डॉ. ज्योती पायघन डाॅ.दिलीप चौधरी व गौरव पारोदे मंचावर उपस्थित होते.
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर,छ्त्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा, गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर,सुशिलाबाई मामीडवार महाविद्यालय चंद्रपूर, हायटेक फार्मसी कॉलेज चंद्रपूर,व जनता महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध महाविद्यालयातील एकूण 23 विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदविला.तर अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. डॉ. दिलीप चौधरी यांनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.परीक्षक म्हणून डाॅ. योगेश्वर दूधपचारे, डॉ. दिलीप चौधरी व प्रा बेताल यांनी कार्य केले प्रथम क्रमांक स्नेहा राजू मेश्राम जनता महाविद्यालय द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक सुशिलाबाई मामीडवार सोशल वर्क महाविद्यालय येथील विद्यार्थी हेमंत अशोक मेश्राम व एसपी लॉ महाविद्यालयातील कुमारी दिपाली रमेश कोटरंगे व तृतीय पुरस्कार जनता महाविद्यालय येथील विद्यार्थिनी कु. तनुजा बालाजी देवाळकर. गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज येथील डॉक्टर राजेश पेचे यांनी कार्यक्रम स्थळाला भेट दिली. प्रास्ताविक डॉ.ज्योती पायघन यांनी केले तर संचालन प्रा.हेमंत निखाडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.बेताल यांनी केले. प्रा.राकेश चव्हाण, प्रा.शार्दूल अडबाले व महेश काकडे यांनी नाव नोंदणी साठी सहकार्य केले.डाॅ पियुष मेश्राम .दिपिका संतोषवार, डाॅ.शितल गाडिवान डाॅ.मनिषा महातळे,डाॅ.ज्ञानेश्वर गायधने प्रा.ह्दयशहा आत्राम, प्रा.गणेश येरगूडे, प्रा.क्षमा गवई, प्रा.सुलभा वानखेडे प्रा.सुरज बोधे, प्रा प्रणाली शेंडे, प्रा.किरण कोंढेकर व दिनेश चामाटे सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.














