जयेंद्र चव्हान
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे दि. 20 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 पर्यंत कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह यशस्वीरित्या राबविण्यात आला.
ह्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सुजाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.भरती गिरडकर यांनी कापीमुक्त अभियान राबवीत असतांना कोणती उपाययोजना केली पाहिजे ह्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.परिपाठादरम्यान विद्यार्थिनींना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली.उदबोधन वर्गाच्या माध्यमातून उमेद अभियानातील समूह संसाधन व्यक्ती तारा कुंभलकर यांनी परीक्षा काळात कोणता सकस आहार घेतला पाहिजे ह्याविषयी माहिती दिली.शालेय विद्यार्थिनींनी प्रभात फेरीद्वारे कॉपीमुक्त अभियानासंदर्भात घोषवाक्यांनी जनजागृती केली.26 जानेवारी 2025 ला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापिका गिरडकर यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्याकारिता ग्रामस्थांनी कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन केले.कॉपीमुजत अभियान सप्ताह यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

