सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांची उपस्थिती
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर, दि 05 : जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथील नूतन विस्तारीत न्यायालयीन इमारतीचा भुमीपुजन समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता न्यायमंदीर, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे होणार आहे. तर मुख्य समारंभ आणि न्यायमुर्तींचा सत्कार सोहळा विद्युत हॉल, वन प्रबोधिनी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आलोक आराधे, न्यायमुर्ती नितीन सांबरे, न्यायमुर्ती अनिल पानसरे उपस्थित राहणार आहेत, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांनी कळविले आहे.

