prabodhini news logo
Home चंद्रपूर ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमीच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमीच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
89

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – अभिनय क्षेत्रातील नवोदित कलाकरांसाठी ज्ञानदीप ॲक्टिंग अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पचारे यांनी विशेष अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत नामांकित प्रशिक्षक अभिनेता अण्णा लोंढे, अभिनेता अविनाश कीर्ती आणि अभिनेता व कॅमेरामन मारुती पोतदार यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत सहभागी कलाकारांनी व्यावहारिक प्रशिक्षण घेतले आणि अभिनयाचा मूलभूत गाभा समजून घेतला. प्रशिक्षकांनी कलाकारांना अभिनय कौशल्य, अभिव्यक्ती, संवादफेक आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला कलाकरांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेच्या शेवटी सर्व कलाकारांना प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) प्रदान करण्यात आले. या आनंदाच्या क्षणी संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. तसेच, आगामी काळात इतर जिल्ह्यांमध्येही अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल, असे राजेंद्र पचारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here