माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनरला पुन्हा गालबोट

0
130

पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३, ७६२०२०८१८० – कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिला भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन छेडले आहे.संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदची हाक दिली असून, त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता डीवायएसपी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.ठिय्या आंदोलन बस स्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे.सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच, शहरातील संपूर्ण रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या आहे.
फलकाच्या अवमानामुळे आंबेडकरी समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. समाज बांधवांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. घटनेचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान या घटनेमुळे शहरातील सर्वच दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवले असून या बंदला व्यापारी महासंघाने देखील पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here