अमेरिकेतील भारतीय स्थलांतरीत नागरिकांना अमेरिकन सरकारने बेड्या घालून भारतात पाठवल्याचा घटनेचा निषेध
शर्मिष वासनिक जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली : अमेरिकेतील भारतीय स्थलांतरीत नागरिकांना अमेरिकन सरकारने बेड्या घालून लस्कराच्या विमानाने भारतात परत पाठविले हे अतिशय अपमानास्पद व अमानवीय कृत्य आहे. जागतीक स्तरावर भारतीय लोकांना अश्या प्रकारची अमानवीय वागणून देत असताना भारत सरकारचे मंत्री मात्र यावर गप्प आहेत, सरकारच्या वतीने कुठलिही भूमिका अमेरिकन सरकारच्या विरोधात घेतल्या गेली नाही याचे निषेध म्हूणन व मोदी सरकारच्या नाकर्तेपणा बद्दल, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात निदर्शन आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. पपु हकीम, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवाहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,घनश्याम वाढई, मुस्ताक हकीम, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, प्रभाकर वासेकर, दिलीप घोडाम, माजी जि. प. सदस्य कविता भगत, योगेंद्र झंजाळ, महेंश जिलेवार, अनिल किरमे, मुन्ना गोंगले, कमलेश खोब्रागडे, जावेद खान, सर्वेश पोपट, चारू पोहने, गणेश उपलवार, स्वप्नील बेहरे, रोशन कोहळे, राहुल वैरागडे सह इतर काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

