prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई

0
131

रमाई किती कठीण होते
तूमचे कष्ट
कपडे घर दागिण्यांसाठी
कधीच नव्हता हट्ट

हळवा सोशिक संयमी
स्वभाव तूमचा साधा
तूमच्यामुळेच बाबासाहेब
झाले सामाजिक योद्धा

तूमचं स्व: तासाठी जगणं
नव्हतच कधी
तूम्ही दिली आम्हा
निर्भिड जगण्याची संधी

रमाई खुप मोठं आहे
तूमचं योगदान
तूम्ही होतात म्हणून
बाबासाहेबांनी लिहीलं संविधान

रमाई तूम्ही होतात म्हणून
बाबासाहेबांना होता आधार
तूम्ही होतात म्हणून
बहुजनांचा झाला उद्धार

कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here