
प्रणय प्र. बसेशंकर
विशेष तालुका प्रतिनिधी वणी
श्री. संत रविदास महाराज जयंती निमित्त वणीत विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारीला संत रवीदास महाराज प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ यांच्या वतीने शाहु, फुले, आंबेडकर, विचारवंत तसेच उत्कृष्ट वक्ता मा. सुषमा अंधारे यांचे जाहीर “प्रबोधन पर्व पहिले” आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतिभा धानोरकर, सरोज बेसुरे (राष्ट्रीय अध्यक्ष), किरण देरकर, मिना भागवतकर (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) असणार आहे. तसेच संत रविदास महाराज जयंतीचे औचित्य सांधुन १५ फेब्रु. शनिवारला ” प्रबोधन पर्व दुसरे ” करण्यात आले आहे. सदर आयोजन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र व संत रविदास महाराज चर्मकार सुधार मंडळ व विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव घोलप (राष्ट्रीय अध्यक्ष, चर्मकार संघटना), संजय देशमुख (खासदार, यवतमाळ-वाशिम) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार संजय देरकर, भानुदासजी विसावे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघटना) माधवराव गायकवाड (प्रदेश अध्यक्ष, चर्मकार महासंघ), रविंद्रजी राजुस्कर (राष्ट्रीय प्रवक्ता, चर्मकार महासंघ), संभा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष, चर्मकार महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या “प्रबोधन पर्व तिसरे” आयोजन १५ फेब्रु. शनिवार सायं. ४ वाजता श्री. संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच संभा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ) यांनी केले आहे.














