
भंतेजी कश्यप यांच्याबरोबर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील सरकारला दिला इशारा
कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो 9860910063, 7620208180 – मागील तीन वर्षापासून माता रमाई जयंती अहिल्यानगर उत्तर तालुका कोपरगाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठी एक गाव एक रमाई जयंती ही संकल्पना झाल्या तीन वर्षापासून सुरू असल्याने तालुका व शहर मिळून हि रमाई जयंती साजरी केल्या जाते पण या जयंतीला काही मनोवादी लोकांनी माता रमाईचे जे फ्लेक्स बोर्ड होते ते फाडले त्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका हा पूर्णतः बंद होता दोन दिवसाची मुदत प्रशासनाला दिली होती की आरोपीला तात्काळ अटक करा ज्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड फाडले गेले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते तरीसुद्धा दोन दिवसांमध्ये त्यांनी एका मनोरुग्णाला पकडून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले या मनो रुग्णाने ते बॅनर फाडले काठीच्या साह्याने फाडले परंतु समाजाला ते मान्य झाले नाही व सकल आंबेडकर समाज म्हणून आणि भंते काश्यप, जितेंद्र जी रणशूर , विजयजी त्रिभुवन, प्रकाश दुशिंग यांनी आमरण उपोषण आज पासून सुरू केले आहे जोपर्यंत आम्हाला खरे आरोपी प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम..














