• पोलिस स्टेशनला तक्रार दाखल! • शिवसेनाचे सुरज शाहा यांनी भद्रावती तालुक्यातील अवैध दारू बंद करण्याची केली मागणी !
भद्रावती प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भद्रावती तालुक्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अश्या अवैध दारु विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे सुरज शाहा यांनी आज केली आहे.
काल याच तालुक्यातील चिचोली येथील रहिवाशी असलेल्या गिरजाबाई उत्तम राहुलगडे या 60वर्षिय महिलेला दारु विक्रेत्याचा मुलगा नामे गोविंद दुपारे यांनी कुठलेही ठोस कारण नसताना जबर मारहाण केल्याची घटना घडली.
दिवसेंदिवस अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत वाढत चाललेली आहे.पोलिसांनी अश्या अवैध दारू विक्रेत्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महिलेला मारहाण प्रकरणात भद्रावतीच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे.
पोलिस कारवाईसह या अवैध दारु विक्रेत्यांचा त्वरित बंदोबस्त करतील काय? या कडे भद्रावतीकरांचे लक्ष वेधले आहे.

