अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

0
80

सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

कळवण तालुक्यातील निवाणे येथे दीड वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचा विनय भंग करनाऱ्या गटलु उर्फ निखिल सुनिल शिरसाठ, या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास २ वर्ष साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कळवण पोलीस स्टेशन कडील गुरनं. 302/2023 भादवि कलम 376(2) (फ), 354 सह बालकांवरिल लैंगिक अत्याचारापासुन (प्रतिबंध) अधिनियम २०१२ चे कलम ५ (एन), ६, ८ प्रमाणे दिनांक २७ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी गटलु उर्फ निखिल सुनिल शिरसाठ, वय १९ वर्ष, रा. निवाणे, ता. कळवण, जि. नाशिक याने फिर्यादी सौ. प्रियंका समाधान आहेर, रा. निवाणे, ता. कळवण,जि. नाशिक यांची पिडीत मुलगी (वय १० वर्ष) हिच्यावर दिनांक २२ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०. ३० ते ११. ०० वा. चे सुमारास त्याने फिर्यादी हिच्या घरी जावुन पिडीत मुलीस खेळण्यासाठी त्याचे घरी घेवुन जावुन त्याचे घरी कोणी नसतांना पिडीत मुलीशी गैर वर्तणूक केली म्हणुन कळवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कैलास ठाकुर यांनी केला असुन त्यांना गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यासाठी पी.एस.आय. विठ्ठल बागुल, पो.शि. कृष्णदास गवळी, पो.शि. पंकज शेवाळे, पो.शि. संदिप गांगुर्डे, नितीन वाघमारे यांनी मदत केली. गुन्ह्याचे तपास अधिकारी पीएसआय कैलास ठाकुर यांनी गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करुन त्याचेविरुध्द विशेष न्यायालय, नाशिक यांचे न्यायालयात दोषारोप पाठविण्यात आले होते. नाशिक येथील विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती घुले यांचे कोर्टात सदर गुन्ह्याची सुनावणी झाली असुन आरोपी गटलु उर्फ निखिल सुनिल शिरसाठ यास आज रोजी मा. कोर्टाने फौ.प्र. संहिता कलम २३५ (२) प्रमाणे दोषी ठरवुन बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ६ व भा.द.वि. कलम ३७६ मध्ये आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास २ वर्ष साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली आहे. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता म्हणुन लिना चव्हाण यांनी काम पाहीले असुन पैरवी अधिकारी म्हणुन पो.हवा. इंगळे यांनी कामकाज पाहीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here