प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने, माननीय आमदार डॉ. मनीषा कायंदे शिवसेना सचिव, मा. किरण पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, माननीय किशोर राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे सुचनेनुसार भद्रावतीच्या नवनियुक्त ठाणेदार माननीय लता वाढीवे यांचे शिवसेना शिंदे गटा तर्फे भद्रावती शहरात आगमना प्रीत्यर्थ स्वागत करण्यात आले. यावेळी भद्रावती तालुक्यातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आले. माननीय वाढीवे यांनी शिवसेना पदाधिकारी यांना सहकार्य करू असा शब्द दिला.
यावेळी आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर, कमलकांत कडसकर शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती, प्रफुल्ल सारवण शिवसेना शहर प्रमुख भद्रावती, सुरज शहा, सुमित हस्तक, मनीष बुच्चे उपशहर प्रमुख भद्रावती, आकाश वानखेडे उपशहर प्रमुख भद्रावती व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

