अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या नीता राजीव मदणकार यांना कारंजा लाड येथील नाथ ट्रस्ट द्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले सौ पुनम एकनाथ पवार, आमदार सईताई डहाके, आमदार हरिषभाऊ पिंपळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमानी, स्वागताध्यक्ष गीरीलालजी सारडा प्रमुख अतिथी संजय कडोळे सर एकनाथ पवार सर्वांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नीता राजीव मदणकार यांना समाजसेवेची आवड असुन अकोला स्त्री शक्ती मंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत.सुरक्षा पदाची भरती प्रक्रिया राबविली तेव्हा त्याचं कार्य उल्लेखनीय आहे स्त्री शक्ती मंच संघटना नवी दिल्ली भारतीय सुरक्षा भरती साठी कार्य, महिलांसाठी विविध कोर्सेस मार्फत मार्गदर्शन करतात शिवाय, गरीबांना कपडे वाटप, कोरोणा काळात मदत, बचतगट चळवळ सक्रीय आहेत. सतत निस्वार्थी पणे प्रयत्न समाजसेवा, पर्यावरण, महिलांचे आरोग्य विषयक महत्वपूर्ण यावर कार्यशाळा घेवुन समाज प्रबोधन करतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाथ ट्रस्ट द्वारे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मानाचा फेटा,शाल , शिल्ड, सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरवण्यात आले.सगळीकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

