prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मातृभाषा मराठी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मातृभाषा मराठी

0
123

मातृभाषा मराठी ही
शान हो महाराष्ट्राची
भाषा अमृताचा झरा
असे मधुर वाणीची

माझ्या माय मराठीचा
आहे फार अभिमान
राजभाषा शासनाची
नित्य करुया सन्मान

माझ्या मराठी भाषेचे
किती गावे गुणगान
सर्व बोलीत विलीन
आहे सुवर्णाची खाण

माय माउली मराठी
वाणी अवघ्या संतांची
ओवी अभंग भजन
शोभा कथा कीर्तनाची

दिनकर उगवता
कानी सुरेल भूपाळी
गाई माय जात्यावर
गाणी सुरेख निराळी

मायबोली भाषा माझी
साहित्याचा अलंकार
शब्दसाज देता काव्या
मिळे सुंदर आकार

लवचीक माझी भाषा
जैसी वळवावी तिला
वैविध्याने नटलेली
अर्थ प्राप्त साहित्याला

नम्रता खरे
मुंबई बोरीवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here