जीत श्रमिक कामगार संघटना मुंबई अध्यक्ष राज मेढे यांच्यावर प्रांत हल्ला.

0
65

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – “नशा मुक्त गोवंडी अभियान” अंतर्गत जीत श्रमिक कामगार संघटना, मुंबईचे अध्यक्ष मा. राज भाऊ मेढे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे काही समाजकंटक, जे नशेच्या आहारी गेले आहेत, त्यांनी राग मनात धरून पूर्ण तयारीनिशी व (pre-planning) ने दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यानंतर, राजावाडी रुग्णालय प्रशासनाने त्यांना दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच, मानखुर्द पोलिस स्थानकाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या गंभीर घटनेची आमदार महेंद्र शेठ यांनी दखल घेतली असून, काल मुंबई टीमने त्यांना रुग्णालयात भेट दिली तसेच पोलिस स्थानकात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. घोरपडे मॅडम यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

सध्या राजा भाऊ मेढे हे राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या सोबत उभे राहून या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि प्रशासनाकडून तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here