मराठी भाषेचा झेंडा
उंच गगनी फडकतो
मायबोली संस्कृतील गंध
दिशा दिशात दरवळतो…
मराठी मातीतील संतांची
शिकवण आम्हाला मिळाली
मधुर शब्द वाणीने त्यांनी
माणुसकी जोडून ठेवली…
माय मराठीचा गोडवा
रक्तात आमुच्या भिनला
अभिमान स्वतंत्र लढा
जगभरात पसरला…
मराठी कोमल गोड शीतल
लोकप्रिय सर्वांची भाषा
नाट्य साहित्य कला
संस्कृतीचा राखला वासा…
नाटककार साहित्यिक कवी
कवयित्रीची मायमराठी शान
मराठी भाषेतील शब्दांचा
त्यांनाच वाटतो अभिमान..
शब्दांस सुवर्णझळाळी
स्वरांवरतील लय भारी
कविता कथा प्रेमगीतांमध्ये
मराठीची गोडी अनोखी सारी..
किल्यांवरती झेंडा दिमाखात
मराठीचा तसाच ठाम मान
शतकानुशतके पुढे वाढू दे
मायबोली हाच अभिमान…
संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका,नांदेड

