विज्ञान नवीन आपल्या जीवनात
उत्कर्षाच्या मार्गाने करा वाटचाल या युगात …..
नवीन तंत्र नवीन यंत्र
धरा विज्ञानाची कास मनात //
जीवन सहज सुलभ केले
मानवी जीवनात परिवर्तन आणले….
केला प्रगतीचा मार्ग मोकळा
मानवी जीवन उत्तम झाले//
विज्ञानाने केली प्रगती
मानवी जीवनाची ……..
घडविली नवनिर्मिती
वाट ही प्रगतीची//
अंधश्रद्धा निर्मूलन केले
अज्ञानाला दूर पळविले….
जाऊया उत्कर्षाच्या मार्गाने
समाजाला उन्नत केले//
सौ. वैजयंती विकास गहूकर
योगा टीचर, चंद्रपूर

