तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज, भद्रावती – वंचित बहुजन आघाडी भद्रावती तर्फे आज दिनांक ३ मार्च २०२५ रोजी महाबोधी महाविहार, बोधगया यांच्या १९४९ च्या व्यवस्थापन अधिनियमामध्ये दुरुस्ती करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भद्रावती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष विशाल रा. कांबळे, तालुका अध्यक्षा संध्या पेटकर यांच्यासह सुनील खोब्रागडे, राखी रामटेके, सिमा देंगळे, लता टिपले, अनुराग खाडे, देवेंद्र वानखेडे, सतीश मस्के, विजय पाटील, भीमा भोवते, सुरेंद्र रामटेके, मंगल कांबळे, प्रकाश पेटकर, पदमा इनमदूल्ला, आम्रपाली गावंडे, शालू मानकर, शिल्पा घडले, तुळसाबाई खोब्रागडे, रजनी रामटेके, पोर्णिमा पाटील, मालती शंभरकर, प्रविता भोवते, चंद्रकला गेडाम, सुशमा पाटील, महेंद्र लभाने, ललिता ताडे, संगीता रामटेके, मालू पाटील, प्रिया कांबळे, रिंकू आटे, सपना रामटेके, मनोरमा मून, अरुण कवाडे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेत महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनात बदल करण्याची आणि बौद्ध समाजाला हक्क मिळवून देण्याची जोरदार मागणी केली.

