
नाशिक प्रतिनिधी – 2 मार्च 1930 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह लढा संपन्न झाला होता.या मानव मुक्तीच्या लढ्यासाठी सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने अभिवादन सभा व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका गायन कोकिळा कडूबाई खरात, प्रसिद्ध ख्यातनाम गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक उमेश गायकवाड यांच्या भीम गीतांचा जलसा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
या अभिवादन सभेस प्रामुख्याने माजी महापौर अशोक दिवे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, यांनी जनतेला मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ सोनवणे, माढा अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर अहिरे, बेल मास्टर यांचे नातू विवेकजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बॉबी भैया काळे, दीपचंद नाना दोंदे,भगवान दोंदे,बाळासाहेब साळवे,संजय खैरनार,उर्मिला गायकवाड,रेश्मा बच्छाव, काळू काका काळे,सुरेश मारू,महेश पगारे,दिपक डोके,मुख्य निमंत्रक कैलास जी तेलोरे,लक्ष्मी ताठे, कविता ताई तेजाळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
अभिवादन सभेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनसागर प्रचंड संख्येने उपस्थित झाला होता. आंबेडकरी जनतेचा प्रचंड प्रतिसाद व उपस्थितीनेच कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे, स्वागत अध्यक्ष युवा नेतृत्व दामोदर अण्णा पगारे, तर युवा भीमसैनिक बिपिन कटारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.















