आई हा शब्द जेवढा सरळ आणि सौम्य आहे त्याहीपेक्षा जास्त हा कठीण आहे .आई दोन अक्षराचा हा शब्द यात पूर्ण सृष्टी समावलेली आहे. मग तो सृष्टीतल्या प्रत्येक प्राण्यांमध्ये असतो .प्राणी पक्षी मनुष्य या सर्वांचा उगम आईच्या गर्भातूनच होत असतो. पक्षी आपल्या पिल्लांना आपल्या चोचीने एकेक दाणे चारवीत असते आपल्या चोचीने बारीक बारीक काडीकचरा आणून उबदार घरटे बनवते. त्याचप्रकारे कांगारू, बंदर ,आपल्या कुशीत पकडून पिलांना वागवीत असतात. वाघ हत्ती उंट अशी प्राणी सुद्धा कळपामध्येच राहतात .म्हणजेच प्रकृतीने आई या शब्दाचा एक खूप मोठा महत्त्वच समजावून सांगितला आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही उपमा खरंच 100% बरोबरच आहे म्हटल्या जाईल. ज्यावेळी आई असते तेव्हा तिची कदर करणे खूप गरजेची असते. नंतर आईचा फोटो लावून तिच्यासमोर गोडधोड जेवण ठेवून पूजा करणारे पण पुष्कळ लोकांना मी पाहिलेले आहे. कारण वयोमानुसार आई ही म्हातारी होत जाते .आणि ती वृद्धावस्थेत आली की मुलांजवळ तिच्यासाठी वेळ नसतो. काही ठिकाणी तर वृद्धाश्रमातच नेऊन सोडतात. हे का म्हणून विचार नाही करत आईच्या त्या वेदना जे तीने प्रसूत्त अवस्थांमध्ये सोसलेले असतात. मुलांना मोठे करण्यात तिचं आयुष्य तिने तीळ तीळ करून काढलेलं असतं. मग तिच्या वृद्धावस्थेत तिला अशी दशा का म्हणून द्यायची? मी माझ्या अवतीभवती 4 ते 5 अशी उदाहरणे पाहिली आहेत फक्त दिखाव्या साठी ही लोक जगत असतात .एक ठिकाणी असं माझ्या लक्षात आलं होतं चार मुलं त्या आईला आणि त्यांच्यामध्ये असं ठरलेलं होतं की प्रत्येकांकडे दोन महिने त्या वृद्ध मातेने राहायचे. आणि दोन महिने पूर्ण झाले तर तो मुलगा दुसऱ्या भावाकडे आईला सोडून यायचा. मला हे म्हणायचं की अशा चार मुलांना जन्म देताना जर त्या आईने फक्त स्वतःच्या उदरात तीन-तीन महिने ठेवले असते तर बरे झाले असते ना अशी नालायक मुलं जन्मालाच नसती आली आणखी एक ठिकाणी मी पाहिलेला जिवंत उदाहरण वृद्ध आईला म्हातारपणी शौचाची अडचण होते म्हणून घराच्या बाहेर भर उन्हात एक शेड टाकून त्या ठिकाणी तिला ठेवला जायचं आणि दिवसातून एकच वेळा तिचे कपडे बदलविले जायचे मग अशा मुलांना काय म्हणणार यात सुनेची चूक नसते तर त्या मुलाची चूक असते .जे आपल्यासमोर पाहूनही तो आंधळ्यासारखा वागत असतो. मला एवढंच म्हणायचं आईने तुम्हाला जन्म देताना पूर्ण पणे एक स्वावलंबी व्यक्ती बनविण्याचे धाडस तिने केले आहे तर तिला इन्स्टॉलमेंट मध्ये प्रत्येक ठिकाणी वाटण्याचे काम करू नये माझा हा लेख ज्यांच्या पर्यंत पोहोचत आहे प्रत्येकांना हात जोडून एक नम्र विनंती आहे आई ही एकच असा जिवंत देव आहे ती जोपर्यंत आपल्यात असते तोपर्यंत तिची खूप चांगल्याने काळजी घ्यावी नंतर तर फक्त आणि फक्त तिच्या आठवणीच उरतात .
रंजना भैसारे
नागपूर

