prabodhini news logo
Home ठाणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजचा लेख – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजचा लेख – आई

0
117

मायाममतेचा झरा म्हणजे आई, मुलांच्या चुका पोटात घालुन त्यांच्यासाठी हवं ते बनवून देणारी प्रसंगी रागावणारी आणि तितकंच जीवापाड प्रेम करणारी या जगातली दुसरी दैवरुपी मुर्ती म्हणजेच आई. काय करत नसते ती आपल्या लेकरासाठी,प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या लेकराला पोटभर जेऊ घालते.त्याचं पालनपोषण करते आणि यांचा तिला कोणताही मोबदला नको असतो.
आईविषयी कितीही बोललं तरी कमीच पडते.आई हा विषयच असा आहे की तो कधीच संपत नाही. आपल्या लेकरांन खूप मोठं व्हावं जगात नाव कमवावं आणि या जगातील एक चांगला व्यक्ती म्हणून नावारूपाला यावे. हीच तिची साधी अपेक्षा असते..आई या शब्दातच सारे विश्व सामावले आहे.नदी ज्याप्रमाणे सगळ्या दुनियेची घाण पोटात घेऊन वाहते तशीच आईसुद्धा आपल्या बाळाचं अनेक अपराध पोटात घालते आणि माफ करते त्याचा उल्लेखही कुठे करीत नाही.
जगातल्या सर्वच मातांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here