कुशीत शिरल्यावर जिच्या
दुःख मनाचे निघून जाई
काळजात भिजवणारी
अशी आहे माझी आई…
माया तिची राहिली जणू
दुधावरची साय बाई
मृदू भावनेत पाझरणारी
अशी आहे माझी आई…
जवळ ती असता माझ्या
काळजी मनी राहत नाई
संकटापासून रक्षणारी
अशी आहे माझी आई…
निस्वार्थ सेवा करते ती
सुखामध्ये भिजवून जाई
आनंदाचा गंध देणारी
अशी आहे माझी आई…
संध्या रायठक / धुतडे
(शिक्षिका), नांदेड

