
पुणे (औंध) प्रतिनिधी – स्त्री म्हणजे प्रेम, ममता, त्याग, कणखरपणा, परत, संयम, सहनशीलता आणि प्रेरणा होय. ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्याग करून त्यांच्या कल्याणासाठी झटत असते. ती एक बहीण आहे जी आपल्या भावाच्या पाठीशी कायम कणखरपणे उभी असते. ती एक पत्नी आहे जी आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असते,आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता तिला कायम असते आणि ती एक मुलगी आहे जिला आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते आणि दोन्ही घराचा दिवा अखंडितपणे तेवत ठेवण्याची जिद्द तिच्यात असते.
या स्त्री जीवनाला त्रिवार सलाम करत हणवते दत्ता आणि त्यांच्या पत्नी यांनी पुणे औंध येथील गोर गरीब महिलांना चादर वाटप करून एक आगळा वेगळा सन्मान केला आहे.यावेळ सामजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे तसेच लक्ष्मण कांबळे, सुनील धोत्रे, आणि संतोष,कांबळे, आदी मंडळी हजर होते.















