prabodhini news logo
Home चंद्रपूर श्री. कन्यका महिला मंडळातर्फे सामुदायिक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन

श्री. कन्यका महिला मंडळातर्फे सामुदायिक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन

0
221

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज़ –
जागतिक महिला दिनानिमित्त श्री. कन्यका महिला मंडळ, चंद्रपूर तर्फे मातोश्रींचा सामुदायिक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. रविवार, ९ मार्च रोजी कन्यका मंदिरात भव्य गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाच्या अध्यक्ष श्रद्धा श्रीपाद मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक व आध्यात्मिकतेचा संगम साधत १७ मातोश्रींचा सत्कार व ८० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. या कार्यक्रमात गायत्री परिवाराने मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष श्रद्धा मुनगंटीवार यांच्या प्रास्ताविकाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सपना मुनगंटीवार होत्या, तर विशेष उपस्थिती प्रसिद्ध गजलकार स्मिता गोरंटीवार वणी यांनी दर्शविली.

कार्यक्रमाची सुंदर सजावट अमृता तुम्मुरवार आणि वर्षा ताटीवार यांनी केली, तर भावना तन्नीरवार यांन संचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष चंदा नालमवार, सचिव लता बोंगिरवार, सहसचिव अंजली बिरेवार, कोषाध्यक्ष मेघा कुल्लरवार, पल्लवी भास्करवार, विजया विरमलवार, साधना कोमरवल्लीवार, ज्योती कोतपल्लीवार आणि राधा उपगंलावार यांनी मोलाचे सहकार्य केले.
महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम संस्मरणीय केला. या सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here