
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका चंद्रपूर – सिंदूर येथील सिंदूर ग्रामपंचायतमध्ये शेतकऱ्यांसाठी ॲग्रीक स्टॉक अर्थात फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमांतर्गत मंडल अधिकारी मोडकवार, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मपाल कांबळे, तसेच तलाठी आराध्या यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असल्याचे मंडल अधिकारी मोडकवार सर यांनी सांगितले. या प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिदूर येथे भरवण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आणि फार्मर आयडीसाठी अर्ज दाखल केले. मंडल अधिकारी आणि त्यांच्या टीमने शेतकऱ्यांना या ओळखपत्राचे महत्त्व समजावून सांगितले व याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शासनाने चालू केलेल्या सर्व कृषी योजना, अनुदाने आणि सुविधा मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.















