
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख
मो. 9860910063,7620208180 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी उपसरपंच निवडीचे प्रस्ताव करण्यात आले होते त्यामध्ये सर्वानुमते विनय भाऊसाहेब गाडे यांची सर्व सदस्य मंडळी सरपंच यांच्या सम विचाराने उपसरपंच पदी निवड करण्यात आली त्यावेळेस सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन सचिन भाऊ चांदगुडे संचालक सहकार महर्षी शंकररावजी काळे साहेब सहकारी साखर कारखाना, सरपंच सुनीताताई बनसोडे, नानासाहेब बनसोडे ज्ञानेश्वर धेनक कैलास धेनक, भागिनाथ धेनक मनोज गाडे माजी उपसरपंच, सुभाष आहेर देविदास गाडे अशोक चांदगुडे अनिल देनक, भानू भारती ग्रामस्थ व सदस्य मंडळ तसेच ग्रामपंचायत चासनळी चे ग्राम विस्तार अधिकारी पटाईत भाऊसाहेब उपस्थित होते विनय भाऊ गाडे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ गुलाल उधळून करण्यात आला उपसरपंच पदी निवड झाल्याबरोबर विनय भाऊ गाडे यांनी सर्व महापुरुषांना अभिवादन करून उर्वरित काळात मी ग्रामस्थांच्या ज्या उनिवा असतील त्या निश्चितपणे भरून काढण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी आश्वासन दिले विनय भाऊ गाडे यांच्या उपसरपंच पदी निवडू नये सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे अनुकूल असे वातावरण निर्माण झाले आहे सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले व आपले मनोगत व्यक्त केले ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुष्पहार घालून फेटा बांधून जल्लोष स्वागत केले व भावी आयुष्यात पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा शेवट झाला.















