रोहिणी खोब्रागडे सह संपादिका – अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परीषदेच्या राज्याध्यक्ष तश्याच कष्टकरी, महिला बहुजन सर्वहारा वर्गाच्या नेत्या मा.मनिषाजी तिरणकर यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ८मार्च २०२५ ला प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तथा प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर कडून सन्मान कर्तुत्वाचा करतांना त्यांना रमाई आंबेडकर पुरस्कार प्रधान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
मनिषाजी तिरणकर ह्या अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परीषदेच्या राज्याध्यक्ष असून त्या सातत्याने कष्टकरी, कामगार, शोषित, दलित, आदिवासी सर्वहारा लोकांच्या कायदेशीर व संविधानिक हक्कासाठी जमीनीवरील लढाई करत येऊन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मा. प्रा.समिंदर शिंदे , प्रमुख संचालिका,मा.प्रशांतजी रामटेके, मुख्य संचालक यांच्या हस्ते एक प्रशस्तिपत्र आणि पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.

