prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शब्दकवितांचे भाव

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शब्दकवितांचे भाव

0
162

शब्दात गुंफून शब्द
शब्दही होतात मोती.
शब्दसुमनांच्या स्तुतीने
जवळ येतात नाती .

शब्दास जोडून शब्द
शब्दही होतात वेद .
शब्दातून शब्दांची
कविता घेते छेद .

अक्षरात शब्दांची
किमया असते भारी .
शब्दात गुंफून शब्द
कविता करते नारी .

अक्षरांचे जोडून शब्द
कवितेची होते ओळ .
लिहिताना कविता
विचारास लागतो वेळ

शब्दास जुळवून शब्द
कविता होते सुंदर .
मायबाप प्रेक्षक
हेच कवीचे मंदिर.

जादूगार शब्दांचा
वेडा असतो कवी .
भक्ती गीत अभंगगाणे
होते सकाळ नवी.

गळ्यात ज्याच्या कोकिळा
त्याने मधुर गाणी गावी .
कवी मनाच्या माणसाने
सुंदर कविता लिहावी.

सौ भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर ता. आंबेगाव जि. पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here