तहान भागवते जल
त्याच्याशिवाय जीवन नाही
ते नसले तर माणुस
फिरतो दिशा दाही.
योग्य तिथेच वापरा
गाड्या,भांडी धुताना
नळ बारीक करा.
निसर्गाचे वरदान हे
वाया कशाला घालता
काही दिवसांनी पाणीसाठा
होईल हो रितारीता.
पाण्याचा वापर तुम्ही
योग्य पद्धतीने करा
झाडवेली चिमणी पाखरं
मिळेल आशिर्वाद खरा.
पाण्यासाठी काही लोक
फिरती चहुकडे वनवन
पाण्याला सांभाळा
हेच आपले खरे धन
सौ सुनंदा वाळुंज ठाणे

