जीवन आहे अनमोल
आनंदाने जगत रहावे
जीवनात येणाऱ्या प्रत्येक
गोष्टीला आनंदाने सामोरे जावे
कोण म्हणतं जीवन
दुःखाचे वाटत आहे
प्रत्येक क्षण हा जीवनाचा
मौल्यवान वाटत राहे.
सुख दिले तर सुख मिळते
दुःख देता दुःखच मिळते
म्हणून दुसऱ्याचे भले पहावे
मग सारे दुःख टळते.
मनातले दुःख सारे
विसरुन जा कायम
आनंदी जीवन ठेवा
हाच जीवनाचा नित्यनेम.
प्रेमाने जग जिंकता येते
नको कुणाशी वैरभाव
नको कुणाशी हेवेदावे
यालाच जीवन ऐसे नाव.
सौ सुनंदा वाळुंज ठाणे

