prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मन

0
116

जीवन खूप सुंदर आहे
आनंदाने जगून घ्यावे.
सुखदुःखाच्या सागरात
एकमेकास प्रेम द्यावे.

तुझं माझं करता करता
आयुष्य सरून जातं.
थकलेल्या जीवाला
त्याचंच मन खात राहतं.

आपल्याच मनाला
आपणच आधार द्यावा .
जीवन खूप गोड आहे
आपणच आपल्या सूर्य व्हावा.

आपल्यासाठी आपल्याला
जगता आलं पाहिजे
हेवे द्यावे न करता
दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे.

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
जीवन सुंदर करता येतं .
द्वेष न करता कुणाचा
मनालाही जगता येतं .

मन सांगते हृदयाला
खूप काही घडून गेले.
दुसऱ्यांसाठी करता करता
माझंच मन मरून गेले .

मन सांगते मनाला
अरे जगून तू घे ना .
स्वतःचाच होऊन आधार .
मनाला धीर देना .

मन सारखं इकडं तिकडं
पाहतंय उडू उडू .
जीवनातील आठवणींनी
मन झाले कडू कडू .

गोड आठवणीचा घेऊन आधार
आपणच आपले खंबीर व्हावे.
वाईट आठवणींना सोडून देऊन
आपणच आपले जगणे जगावे.

एकांतात बसताना
मन माझं भरून आलय.
म्हणून सांगते हृदयाला
खरंच जगायचं राहून गेलय
खरंच जगायचं राहून गेलय

सौ भारती वसंत वाघमारे
मंचर ता. आंबेगाव जि.  पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here