मन माझे
निळे अंबर, झुलते झुंबर
फिरते फिरते
क्षणात हसते,क्षणात गाते
दवबिंदू होऊन पापण्यात मिटते
मिटते मिटते
कधी लाजाळुचे झाड बनते
मन माझे
प्रेमात विरते ,शब्दात गुंतते
नात्यांचे सेतू बांधते
जगण्याचा ते भार पेलते
मन माझे
कधी पावसाची रिमझिम
सोबतीची रुणझुण
सुख दुःखाची गुणगुण
शांत अशांत
मन माझे
रंगुनी रंगात साऱ्या
अंबर होते, झुंबर होते
झुलते झुलते
क्षितिजाच्या पार जाते
मन माझे
माझेच कोंदण होते
मन माझे
माझी मी,,माझेच सारे
माझ्यात सामावुनी
मी मी होते
क्षितीजावर उभी राहुनी
आकाश पेलते
मन माझे
फिरते सुर्य बिंब होते
झुलते झुलते
हसते गाते ,झुंबर होते
अंबर होते….
गुलाब अनिल वेर्णेकर.. गोवा

