मनाला वाटते उंच उडत
आकाशाच्या पार जाव
स्वप्नांच्या रंगात न्हाहून
आनंदाच्या क्षणांत नाचाव…
मनाचे बोल जीवनी अनमोल
कोणाशीच काहीही न बोलावं
एकट्यानेच बसून स्वतःशी
आठवणींमध्ये हरवून जावं…
कधी कधी मनाला वाटतं
पुन्हा लहान होऊन जगाव
निरागस हसू चेहऱ्यावर घेऊन
आनंदाच उधाण आणाव…
मनाला वाटत भूतकाळात
नव्याने उजळून पहावा
आठवणींमध्ये पुन्हा रमुन
क्षण नवा उजळून टाकावा…
मनाला वाटतं विसरून सार
वेदना प्रेम पुसून टाकावं
नव्या सुरावटीत सूर मिळवून
उमेदीनं पुन्हा उभं रहावं…
मन हे असतं वेडं वाकडं
हसत कधी रडत राहत
शांत किंवा वादळासारखं
पण नेहमीच स्वप्नं रंगवत…
संध्या रायठक/ धुतडे
नांदेड

