prabodhini news logo
Home चंद्रपूर “गिलबिली येथे मोफत शिलाई मशीन वाटप तसेच महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न…

“गिलबिली येथे मोफत शिलाई मशीन वाटप तसेच महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न…

0
210

बल्लारपूर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गिलबिलि आदिवासी महिलांना रोजगार मिळावे त्यांना कौशल्य प्राप्त व्हावे या उद्देशाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाच्या प्रशिक्षणाची सुरुवात 1मार्च 2025 ला”जनसामर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर तसेच निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ हडपसर पुणे यांचे मार्फत 20 लाभार्थी महीलान सोबत सुरुवात करण्यात आली होती त्या निमित्याने आदिवासी महिलांना 15 शिलाई मशीन चे मोफत वाटप समाज भवन गिल्बिली येथे करण्यात आले..
तसेच महिलांसाठी सक्षमीकरण कार्यशाळा घेऊन सदर कार्यशाळेत नृत्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा घेण्यात आली सर्व स्पर्धेचे बक्षीस पुणे येथून आलेले वकील श्री.केशव धेंडे सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .तर संस्थेच्या अध्यक्षा कू.अश्विनी कोल्हेकर यांनी सदर प्रक्लप चा दुसरा टप्पा म्हणजे महिलांकरिता मोफत आरोग्य विमा, बालकांना मोफत आरोग्य पोषण कीट,विद्यार्थ्यांना मोफत ट्यूशन , तसेच मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ दिल्या जाईल त्या करिता लाभार्थी निवड यादी करण्यात येऊन टप्पा 2 चा शुभारंभ करण्यात आले मंचावर वैष्णवी पवार, संदीप खांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पंकज गणवीर यांनी केले व कार्यशाळा संपन्न झाली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here