कपातीला विरोध, दरवाढीचा आग्रह; महावितरणची राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका

0
113

ग्राहक हितासाठी ही दरकपात कायम ठेवावी:दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर- विदर्भ प्रांत ची मागणी.

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज, नागपूर:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं पहिल्यांदा दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात साधारणपणे १ ते १५ टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील २ कोटी वीज ग्राहकांना होणार आहे. महावितरणनं यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिला आहे. २०२५-२६ ते२०२९-३० या कालावधीमध्ये १२ टक्के ते २३ टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या ग्राहकांना मोठी वीजदर कपात मंजूर केली, मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने वीजदरवाढीची मागणी करत पुन्हा आयोगाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आयोगापुढे फेरविचार याचिका सादर करण्यात येणार आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर प्रस्तावानुसार दरवाढ मंजूर करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे अधिक वीजवापर असलेले घरगुती ग्राहक, औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांवर वीजदरवाढीची टांगती तलवार आहे.

आयोगाने गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा महावितरण, अदानी, बेस्ट व टाटा वीज कंपनीच्या ग्राहकांसाठी एक एप्रिलपासून वीजदर कपात मंजूर केली होती. मुख्यमंत्री कृषी वाहिनी, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, कृषी सौरपंप आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीजदर कपात होणार आहे.

९२ हजार कोटींचे संकट
महावितरणचे पाच वर्षांचे वीजदर प्रस्ताव आयोगाने मंजूर केले होते. मात्र महावितरणने ४८ हजार कोटी रुपयांची तूट दाखवून यंदाच्या वर्षात काही ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव दिला होता आणि पुढील वर्षीपासून दरकपात सुचविली होती.

आयोगाच्या वित्तीय ताळेबंदानुसार ४४ हजार कोटी रुपये शिल्लक महसूल दाखविण्यात आली. महावितरणपुढे पुढील पाच वर्षात ९२ हजार कोटी रुपयांचे संकट आहे.

महावितरणचे घरगुती, औद्याोगिक, वाणिज्यिक ग्राहक दरकपात होणार, म्हणून सध्या खूश आहेत. पण महावितरणने फेरविचार याचिकेची तयारी केली असल्याने आणि ती आयोगाने मंजूर केल्यास ग्राहकांना मात्र या आनंदाला मुकावे लागणार आहे.

जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने यांचा विरोध करीत आधीच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात वीजदर अधीक असल्याने आता वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार वीजदर कपात कायम ठेवण्याची मागणी लावून धरली आहे, आणि वीजदरवाढ न करण्याची मागणी केली आहे, आणि म्हणूनच जनतेने आणि सर्व ग्राहकांनी जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेसोबत उभे राहण्याची आवश्यकता आहे असे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here