prabodhini news logo
Home चंद्रपूर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी बाबूपेठ येथे पाणपोई चे उदघाटन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी बाबूपेठ येथे पाणपोई चे उदघाटन

0
196

प्रशांत रामटेके मुख्य संपादक – रणरागिणी महीला नागरी सहकारी पतसंस्था व महिला बचत गट बाबुपेठ यांच्या सयुक्त विद्यमाने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती निमित्त स्थानिक नेताजी चौक बाबूपेठ, चंद्रपूर येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.
चंद्रपूरचे अन्न व पुरवठा निरीक्षक सुमेध चवरे साहेब, मेडिकल ऑफिसर डॉ शरयू गावंडे, यांच्या शुभ हस्ते रणरागिणी पतसंस्था च्या संस्थापक अध्यक्षा सौ चंदा वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी विवेक पोतनूरवार, अनिल तुंगीडवार, महेश म्याकलवार, मुकेश गाडगे, तसेच रणरागिणी संचालक मंडळ, महिला बचत गट सदस्यां यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम पतसंस्था अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून आपल्या मनोगतातून बाबूपेठ बचत गट तसेच रणरागिणी पतसंस्था यांच्या मध्यमातून दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेत असून उन्हाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूनसाठी दरवर्षी याठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते, यासाठी पतसंस्थेचे सर्व संचालक व महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते,याप्रसंगी उपस्थित श्री चवरे सर यांनी महिलांच्या पुढाकारातून दरवर्षी राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची प्रशसा करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे, उपस्थित महिलांचे आभार सौ. प्रिया अगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here