माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील वायगाव येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक सभागृहाची आवश्यकता होती. यासंदर्भात वायगाव येथील नागरिकांनी माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तेव्हा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर सामाजिक सभागृहाच्या बांधकामांसाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला. सदर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून सभागृहाचे लोकार्पण माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काॅंग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते.

